माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी है गेल्या दहा वर्षापासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. “माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
मोहिब कादरी यांचे लेखन बहुपदरी आहे. ते ज्या ग्रामीण परिसरातून आले आणि आता जेथे स्थायिक झाले, तेथील वातावरण, तेथील माणसे वे साक्षात करतात महत्वाचे म्हणजे दरिद्री आणि सामान्य माणसातल्या असामान्यत्वाचा शोध घेतात, विशेषतः स्त्रियांनी उदार आणि संघर्षशील व्यक्तिमत्वामुळे कुटुंब कसे सावरले, याचेही चित्रण ते आवर्जून करतात. दूसरा पदर आहे तो से ज्या मुस्लिम समाजातून येतात, त्या समाजाचा मुस्लिम समाजातील उदार परंपरेचा जसा सहज निर्देश येऊन जातो. त्याप्रमाणेच मुस्लिम म्हणून येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवाचेही येथे चित्रण येते. खरे तर हा पदर अधिक महत्त्वाचा आहे. संमिश्र समाजात राहताना चांगले अनुभव लेखकाला जसे येतात. त्याप्रमाणेच कडवट अनुभवही येतात. पण मोहिब कादरी यांचा विशेष असा की, असे अनुभव सांगताना ते कोठेही कडवट होत नाहीत. समाजवास्तव म्हणून त्यांचा ते स्वीकार करतान
मोहिब कादरी यांना धर्मापलीकडे जाऊन माणसे नीट वाचता येतात. कारण त्यांचा माणसांवर प्रचंड विश्वास आहे ठसठशीत व्यक्तिरेखा छोट्या छोट्या वाक्यातून गतीमान होत जाणारी चित्रदर्शी शैली यातून हे लेखन अत्यंत प्रत्ययकारी होत जाते. धर्माला उन्मादी स्वरूप प्राप्त होण्याच्या आजच्या काळा जाती-धर्मापलीकडे जाऊन माणूसपणाचा गौरव करणारे हे लेखन वाचकांना जगण्यासंबंधीचे नवे मान देऊन जाईल, असा विश्वास वाटतो.
– नागनाथ कोत्तापल्ले
Reviews
There are no reviews yet.