या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह…!
झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra
₹280.00झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्वजण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.
वाचावे कसे हे शिकवण्यासाठी “नवी क्षितिजे” हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले “झुंडीचे मानसशास्त्र” हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळया भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे “द क्राउड”, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे “द ट्रू बिलिव्हर”, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे “झुंडी” आणि “सच्चा अनुयायी” या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि झुंडीचे मानसशास्त्र हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पुरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)
Reviews
There are no reviews yet.