या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप असे आहे की, वाचकांनी कोणतेही पान उघडावे आणि त्या-त्या व्यक्तीविषयीची आठवण वाचावी. पुस्तक सलग वाचले तरी काही हरकत नाही आणि असे मधूनच कोणतेही पान उघडून वाचले तरीही वाचनाच्या आनंदात काहीच फरक पडत नाही. वाचकांच्या सोयीसाठी भारतातील विद्वान (33), आशियायी विद्वान (20) व पाश्चात्त्य विद्वान (22) असे तीन विभाग केले आहेत. पण पुस्तकात क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही. कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, त्या सर्व काहीएक सूत्रात पकडता येणे अवघड आहे. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग वाचल्याने त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!
₹150.00 ₹120.00
असेही विद्वान | Asehi Vidwan
असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
Meet The Author
No products were found matching your selection.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1.2 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 140 |
Related products
तेजसी | Tejasi
या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे
ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर | Dnyanmurti Govind Talwarkar
जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड यांविषयी त्यांच्या मुलींनी लिहिलेले पुस्तक.
मुका म्हणे… | Muka Mhane…
मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.
इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य | Islam Aani Sahishnuteche Bhavitavya
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan
शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
Reviews
There are no reviews yet.