1949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले. जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे ! मात्र त्या विकासप्रक्रियेत अनेक परपस्पर विरोध सामावले आहेत. चीनचे एक भव्य स्वप्नही आहे, जगाचे नेतृत्व करून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकण्याचे ! चीनच्या या विकासशैलीमुळे चीनमध्ये आणि जगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.चीनचे जागतिक व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने सामीलीकरण कसे करायचे, हा आता जगापुढील मोठा प्रश्न आहे. मागील चाळीस वर्षांतील चीनच्या या आर्थिक आणि राजकीय वाटचालीचा, त्यामागील विविध प्रेरणांचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
₹280.00शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
Reviews
There are no reviews yet.