धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जोपर्यंत स्वतःला सुसंस्कृत आणि विचारसमृद्ध बनवत नाही आणि समाजातील वंचित जातींच्या समाजातील जागृतीला आपल्या अंगी मुरवत, तिचे रूपांतर क्रांतिकारक शक्तीत करत नाही, तोपर्यंत हिंदू सांप्रदायिक विचारांच्या वाढत्या उधाणाला रोखणे अवघड आहे. हिंदू कडवेपणाला आणि मुस्लीम मूलतत्त्ववादाला रोखू शकेल असा एक मार्ग म्हणजे मुस्लीम समाजाचे जीवन धर्मनिरपेक्ष बनविणे. मुसलमान नेत्यांनी जर आपल्या समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित केले आणि समाजाला विकासभिमुख केले, तसेच त्यांच्या अलगतेवर जोर दिला नाही, तर केवळ मुस्लीम मूलतत्त्ववाद ओसरेल, एवढेच नव्हे तर हिंदू सांप्रदायिक प्रचारकांच्या खात्यातील बहुतेक अस्त्रे निकामी होतील.
आत्मकथा | Aatmakatha
₹560.001922 ते 1995 असे जवळपास 73 वर्षांचे आयुष्य मधु लिमये यांना लाभले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1982 पर्यंत ते सक्रिय राजकारणात राहिले. ‘चले जाव’ चळवळ, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘राष्ट्रीय आणीबाणी’ या तिन्ही प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून ते तरुणपणापासून वावरले. महाराष्ट्रातच जडणघडण झालेली असूनही बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले, उत्तम संसदपटू अशी त्यांची ख्याती राहिली. अखेरची 12 वर्षे त्यांनी राजकारणाचे भाष्यकार आणि लेखक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या नावावर लहान-मोठी अशी चार डझन (हिंदी व इंग्रजी) पुस्तके आहेत.
अशा या मधु लिमये यांनी वयाच्या पंचविशीपर्यंतचे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंतचे लिहिलेले आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे.
यातून त्यांची बालकुमार वयातील व तारुण्यातील झंझावाती वाटचाल तर दिसतेच, पण स्वातंत्र्यपूर्व पाव शतकातील भारतीय समाजजीवनाची विहंगम दृश्येही पाहायला मिळतात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील त्यांची तेजस्वी वाटचाल आणि भारताचे वादळी राजकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल.
Reviews
There are no reviews yet.