देश-विदेशांतला प्रवास हा आंतरिक आनंद देणारा अनुभव असतो. कालांतराने दुधाचे दही व्हावे त्याप्रमाणे हे अनुभव आंबून त्यांची अनुभूती होते. छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचे किंवा निसर्गाचे जशाचे तसे प्रतिबिंब पडल्याचे दिसते. चित्राची गोष्ट वेगळी आहे. चित्रकार एखादी व्यक्ती किंवा निसर्ग पाहताना आपल्या मनात भावनांचे जे कल्लोळ उसळले त्याचे मिश्रण आपल्या चित्रात करत असतो. या पुस्तकात अंतर्भूत झालेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीत लिहिली आहेत. मात्र ही निव्वळ प्रवासवर्णनं नाहीत. लेखक त्या-त्या देशांच्या नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक रसायनात आकंठ बुडाला आहे. त्यामुळे लेखकाने प्रभाववादी शैलीने लेखन केलं आहे, ज्याप्रमाणे चित्रकार प्रभाववादी (इम्प्रेशनिस्ट) शैलीतून चित्रे काढतो, म्हणूनच या प्रवासवर्णनात वाचकाला लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांचे अस्तित्व जाणवते. मात्र, त्याच्या मनात त्या-त्या देशांत प्रवास करण्याची इच्छादेखील निर्माण करते.
वैचारिक घुसळण | Vaicharik Ghusalan
₹280.00जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टीकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
Reviews
There are no reviews yet.