गजा हा शरीरविक्री करणाऱ्या माउलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्यांचे जीवघेणे दुःख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी साद घालीत आहेत.
आठवणी जुन्या शब्द नवे | Athvani Junya Shabda Nave
₹100.00आठवणी जुन्या आणि शब्द नवे. वर्षानुवर्षे कुठेतरी साठवून ठेवलेले आणि साठून राहिलेले हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. भूतकाळात डोकावून पाहताना प्रसंग, चित्रे जशीच्या तशी उभी राहात गेली. आणि नकळत कागदावर उतरत गेली. हे चित्रण म्हणजे केवळ घटनांचे किंवा व्यक्तिरेखांचे वर्णन नसून, त्याच्यामागे असलेल्या मनातील भावनांचा प्रवाह आहे.
Reviews
There are no reviews yet.