मराठी ख्रिस्ती समाजातील अनुभवविश्वाचं व विचारांचं सुबोध ललित शैलीत प्रत्ययकारी चित्रण करणारं हे पुस्तक.या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या झाल्यानंतर डॅनिअलच्या मनात या लेखनाचे बीज पडले. भाषा प्रवाही, मांडणी सुबोध आणि युक्तिवाद तर्कशुद्ध असे हे लेखन आहे. एका अर्थाने धाडसी सुध्दा!
जून 2018 ते जून 2019 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून ‘मंच’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली आणि जानेवारी 2020 मध्ये कुमार केतकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा 50 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असा ताराबाई शिंदे यांच्या नावाचा 2020चा ललित गद्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
वैचारिक घुसळण | Vaicharik Ghusalan
₹280.00जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा… लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
Reviews
There are no reviews yet.