| Weight | .30 kg |
|---|
राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband
₹240.001947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.


₹250.00 ₹200.00
राजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.
1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा ज्येष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.
| Weight | .30 kg |
|---|
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले – ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ख्याती असलेल्या मधु लिमये यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘रिलीजियस बिगॉरिटी’ आणि ‘लिमिट्स ऑफ ऑथॉरिटी’ या पुस्तकांतील निवडक लेख.
भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.


Reviews
There are no reviews yet.