15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे हे 75 वे वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वाटचालीत साधनाला बालकुमारांचे जसे अगत्य होते तसेच तरुणाईचेही होते. त्यामुळे बालकुमार वाचकांसाठी वर्षातून एखादा विशेषांक आणि युवा वर्गाची अभिव्यक्ती नियमित अंकांमध्ये, ही परंपरा साधनात कायम राहिली आहे. मात्र 2007-08 मध्ये म्हणजे हीरकमहोत्सवी वर्षात साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाच वर्षांनी युवा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली.
Size
M, S
Pages
60
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Sadhana Yuva Diwali 2023 | साधना युवा दिवाळी 2023” Cancel reply
सणांचे कुळ आणि उत्सवांचे मूळ (लेखसंग्रह) – भारतातील विविध सणांचा उगम कसा झाला, त्यांचा मूळ हेतू काय होता आणि आता ते सण कितपत कालसुसंगत आहेत, याची विवेकवादाच्या अंगाने केलेली मांडणी.
या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात :
संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.
‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा’ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.
आसामी, अरेबियन, कुर्दिश, पर्शियन, कोरियन आणि इंग्रजी या सहा भाषांमधील सहा चित्रपटांवरील गोष्टीरूप लेख.
या सर्व चित्रपटांच्या केंद्रस्थानी मुले आणि त्यांचे विश्व आहे, पण रूढ अर्थाने हे बालचित्रपट नाहीत.
साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
या अंकात विविध क्षेत्रातील पाच कर्तबगार तरुण तरुणींच्या मुलाखती आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून या मुलाखती घोसात आल्या आहेत. या मुलाखती युवकांच्याच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या वाचकांच्या विचारांचे क्षितिज रुंदावतील आणि मुख्य म्हणजे समाजसन्मुख जगण्यासाठी अधिक आशादायी भावना मनात जागृत करतील.
Reviews
There are no reviews yet.