Sale

240.00

समता संगर | Samata Sangar

समता संगर (लेखसंग्रह) – 1998 ते 2013 या 15 वर्षांत, साधनाचे संपादक असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या अनेक संपादकीय लेखांमधील निवडक 70 राजकीय – सामाजिक विषयांवरील लेख.

     

Share

Meet The Author

समतेचा विचार हा साधनेच्या दृष्टीने आम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तो साधनेचे वैचारिक प्राणतत्त्व आहे, असे म्हटले तरी चालेल. या विचाराची काहीशी पिछेहाट आजच्या घडीला चालू आहे का, याचे चित्र सर्व समतावाद्यांप्रमाणेच आम्हालाही अस्वस्थ करते. समता-संगराची आम्हाला जाणवणारी जी पंचसूत्री आहे, त्याच्या कृतिशील आग्रहातून समतेची आज काहीशी अडखळत चालू असलेली वाटचाल दमदारपणे होऊ शकेल, असे आम्हाला वाटते.

जातिसंस्थेवर आधारित विषमतेचे उच्चाटन करणे, कौटुंबिक पातळीवर तीव्रतेने जाणवणारी स्त्री-पुरुष विषमता केवळ सद्भावना वा करुणा यांवर समतेची अंमलबजावणी अवलंबून न ठेवता प्रत्यक्ष जगण्यात (विशेषतः आर्थिक हितसंबंधांत) दूर करणे, सहकार्य व समता प्राप्त करणे आणि प्रसंगी त्यासाठी संघर्ष करणे, समतेच्या नावाने जे गळा काढतात, परंतु ज्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत त्या तथाकथित समरसतावादी विषमतावाद्यांचा प्रतिरोध करणे आणि या सर्वांसाठी समतावाद्यांची आज विस्कळीत असलेली छावणी एकसंध करून त्यांची भरभक्कम एकजूट उभारणे ही पंचसूत्री आम्हाला महत्त्वाची वाटते.

Weight 0.3 kg
Dimensions 14 × 1.8 × 21.5 cm
Size

M, S

Pages

288

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समता संगर | Samata Sangar”

Your email address will not be published.