भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, साने गुरुजींनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा पहिला प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून ‘अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे, अन्यथा मी आमरण उपोषण करीन’ अशी घोषणा केली. आणि जानेवारी ते एप्रिल 1947 या चार महिन्यांत जनजागृती करण्यासाठी झंझावती दौरा केला. त्या काळात एकट्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी 400 पेक्षा अधिक सभा घेतल्या. तेव्हा गावोगावची 300 मंदिरे खुली झाली. मात्र पंढरपूरच्या बडव्यांनी दाद दिली नाही, म्हणून 1 मे 1947 रोजी गुरुजींनी उपोषण सुरू केले… आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. तो एकूण घटनाक्रम भारतीय समाजजीवनाच्या कुरूपतेचे दर्शन घडवणारा होता, मात्र शतकानुशतकांचे जडत्व लाभलेल्या रूढी-परंपरा (उदात्त ध्येयवादाच्या बळावर) मोडीत काढता येतात, याची प्रचिती देणाराही होता. त्याची एक झलक अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
आधार नसलेली माणसं | Aadhar Nasleli Mansa
₹160.00वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.
Reviews
There are no reviews yet.