वस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे 2013 नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang
₹240.00देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारांपासून प्रभारी राजदूतांपर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळुवार संवाद साधत आहेत.
Reviews
There are no reviews yet.