एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्त्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पाहिलेल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्त्विकदृष्ट्या गहन आणि नैतिकदृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे, असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरूपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.
समाज, राजकारण, कला | Samaj, Rajkaran, Kala
₹320.001931 ते 2012 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले राम बापट अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यांची ओळख प्रामुख्याने, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांचे खंबीर पाठीराखे अशी होती. पण त्यांना इतिहास, समाजशास्त्र, मानव्य शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत असलेली गती थक्क करणारी होती. शिवाय, साहित्य, नाटक, सिनेमा यांचे ते साक्षेपी समीक्षक होते. त्यामुळे व्हर्सटाइल जिनियस असे त्यांच्याबाबत म्हणता येते. त्यांच्या स्मृतीनिमित्त, 2013 ते 2023 या दशकभरात दरवर्षी एक याप्रमाणे व्याख्याने आयोजित करण्याचे काम मकरंद साठे व गजानन परांजपे या दोघांनी हाती घेतले व पार पाडले. त्या व्याख्यानमालेत देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निमंत्रित केले गेले. अभ्यासपूर्ण व मर्मग्राही अशी ती व्याख्याने इंग्रजीतून झाली. त्या व्याख्यानांचे अनुवाद व संपादन करून तयार केलेले हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.