साधारण पाचवी-सातवीतल्या एका मुलाच्या या गोष्टी आहेत. आजूबाजूच्या गोष्टींमधून काहीतरी ‘तात्पर्य’ काढायला त्याला मजा वाटते. म्हणून तो खूप अंदाज बांधून तात्पर्य काढत राहतो. त्याची तात्पर्य प्रत्येक वेळी काही ‘आदर्श’ वाटतील अशी नसतात. कधी त्याचा अंदाज चुकतो. डासावरच्या गोष्टीत त्याचा अंदाज कदाचित चुकला असेल. पण लाजाळूचं झाड, गुलमोहराचं झाड अशा काही गोष्टींबद्दलचे त्याचे अंदाज बरोबरही असतील. काही गोष्टींबद्दल तो अंदाज बांधतो पण स्पष्ट तात्पर्य काही त्याच्या हाताला लागत नाही. उदाहरणार्थ, ‘हातगाडी’ किंवा ‘वेग’ किंवा ‘करवंद’ या गोष्टींमधून स्पष्ट सांगता येईल असं तात्पर्य सापडत नाही. म्हणजे चांगल्या-वाईट भावना मनात येतात, पण ठोस तात्पर्य नाही. कधी कधी त्याला स्वतःचेच दोष सापडतात. उदाहरणार्थ, ‘कुरुपता’ ही गोष्ट. तर, अंदाज बांधत-बांधत तात्पर्य काढण्याच्या या मुलाच्या सवयीतून तयार झालेल्या या गोष्टी.
रानडे, गांधी आणि जीना | Ranade, Gandhi ani Jinnah
₹200.00डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘रानडे, गांधी अँड जीना’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे.
या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात.
या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.







Reviews
There are no reviews yet.