Weight | 1 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1.5 × 21.5 cm |
Size | M, S |
श्याम | Shyam
₹180.0024 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तऐवज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.
घनशाम गेडेकर –
त्रिकोणी साहस पुस्तक अतिशय चांगले आहे. वाचायला घेतलं कि समोर काय होते, हे जाणून घेण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही. लेखिकेच्या अफाट कल्पनाशक्तीला सलाम…
परंतु, पुस्तकात काही प्रश्न अनुत्तरित राहतात… अमेय दादाचे पुढे काय होते, सागर अंकल कोण होते… साहसचे पुढे काय होते, निर्मिक काय करतो…. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या पुस्तकाचा दुसरा भाग येणार आहे काय ?