आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचं राहून गेलं होतं. ‘कोरोना’ काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन 1964 मध्ये लिहिलेलं नाटक सन 2020 मध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. आज भोवती जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शनही केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असं मला वाटू लागलं. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला.
Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत
₹70.00कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.
Reviews
There are no reviews yet.