Nahi Nachnar Adivasi Aata | नाही नाचणार आदिवासी आता
₹120.00हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधिमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लिम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचे दांडगेपण तर आहेच!
Jwarichi Kahani | ज्वारीची कहाणी
₹120.00यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!
ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.
Angry Young Secularist | अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट
₹125.00अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहलेली १३ पत्रे आणि दलवाईंवर इतर १३ मान्यवरांनी लिहलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.
Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022
₹130.00साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक
धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam
₹140.00‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
₹140.00माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Bhartatil Muslim Rajkaran | भारतातील मुस्लीम राजकारण
₹140.00भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद