समता संगर (लेखसंग्रह) – 1998 ते 2013 या 15 वर्षांत, साधनाचे संपादक असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या अनेक संपादकीय लेखांमधील निवडक 70 राजकीय – सामाजिक विषयांवरील लेख.
सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह) – 2006 ते 2013 या आठ वर्षांत साधनाचा युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून काम करताना लिहिलेल्या संपादकीय लेखनातील निवडक 45 लेख.
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, आंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा 20 नामवंतांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.