Shop

तेजसी | Tejasi

120.00

या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.

– ना. ग. गोरे

     

 

 

Saleनवी पुस्तके

त्रिकोणी साहस | Trikoni Sahas

480.00

या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल…

थर्ड अँगल | Third Angle

70.00
थर्ड अँगल (भाष्यचित्रे) – प्रॅक्टिकल क्लबमध्ये एक थिअरॉटिकल मित्र नियमितपणे येतो आणि प्रॅक्टिकल मित्रांसमोर भाषणे देऊन जातो, त्यातील निवडक 12 भाषणे.

     

थेट सभागृहातून | Thet Sabhagruhatun

240.00
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, आंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा 20 नामवंतांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.

     

थैमान चंगळवादाचे | Thaiman Changalvadache

50.00

आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन् उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

     

दंतकथा । Dantkatha

60.00

हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या 1990 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जिवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतीकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.

     

दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)

100.00

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता) । Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita)

60.00

एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे.

– मकरंद साठे (मुलाखतीतून)

     

1 14 15 16 28