Maharashtrat Vinoba| महाराष्ट्रात विनोबा
₹450.00विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.
भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).
या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.
Namdar Gokhale Charitra | नामदार गोखले चरित्र
₹200.00१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.
Sadhana Yuva Diwali 2023 | साधना युवा दिवाळी 2023
₹80.00अनुक्रम
१. आणि मी ‘श्यामची आई’ पडद्यावर साकारली… – गौरी देशपांडे
२. पुणे ते ऑस्ट्रेलिया व्हाया टीव्ही मीडिया – हर्षदा स्वकुळ
३. हमदर्द विद्यापीठाकडून, उम्मीद अकेडमी कडे – वली रहमानी
४. ‘ऑड मॅन’ चा प्रवास नाशिक ते न्यूयॉर्क- धैर्य दंड
५. सिलीकॉन व्हॅली. टितोडी आणि किस्सान जीपीटी- प्रतीक देसाई
Bijali | बिजली
₹100.00सामाजिक तत्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरूर आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:
श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरुनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.
वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)
Janata Pakshacha Prayog – Khand 1 Te 4 | जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4
₹1,200.00१ मे १९२२ ते ८ जानेवारी १९९५ असे ७२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी १९९४ मध्ये Janata Party Experiment या शीर्षकाखाली इंग्रजीत १२०० पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड १ व २ चे अनुवाद वासंती फडके यांनी तर खंड ३ व ४ चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत ३५० रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. १९७५ ते १९८० या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!
Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8
₹2,000.00१५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून २०५ लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील १२० व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.
७८ मुलाखतींची पुस्तके | 78 Mulakhatinchi Pustake
₹900.00आम्हा घरी धन
– संपादन : विनोद शिरसाठ
(महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य पुरस्कारप्राप्त २२ व्यक्ती व त्या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची एक अशा एकूण २३ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह)
देव तेथेचि जाणावा
– संपादन : विनोद शिरसाठ
(महाराष्ट्र फाउंडेशनचे समाजकार्य पुरस्कारप्राप्त २५ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या २५ मुलाखतींचा संग्रह)
धर्मरेषा ओलांडताना
– संवादक : हिनाकौसर खान
(आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या १५ मुलाखतींचा संग्रह)
केशवरावांच्या मुलाखती
– विनोद शिरसाठ
(दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केशवरावांच्या डेक्कन कॉलेज परिसरात भल्या पहाटे घेतलेल्या ११ मुलाखतीचा संग्रह)
तीन संपादकांच्या मुलाखती
– संवादक : संकल्प गुर्जर व जायली वाव्हळ
– अनुवाद : प्रभाकर पानवलकर व सुहास पाटील
(इंग्रजी पत्रकारितेतील एन. राम, शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या तीन पिढ्यांतील तीन मोठ्या संपादकांच्या मुलाखतींचा संग्रह)
भारत सासणे यांची मुलाखत
– संवादक : दासू वैद्य
(उदगीर येथे झालेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची त्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली दीर्घ मुलाखत)