Shyamchi Aai | श्यामची आई
₹160.00अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.
-आचार्य अत्रे
Shyamchi Aai Watchal eka Sahityakrutichi | श्यामची आई वाटचाल एका साहित्यकृतीची
₹100.00‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल ८८ वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे.
Tarunaisathi Dr. Narendra Dabholkar | तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर
₹200.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि नंतरच्या कालखंडातही अनेक युवक-युवती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या तरुणाईला डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा अधिक तपशीलवार परिचय व्हावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीला प्रेरणा मिळावी, हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे.
Thaiman Changalvadache| थैमान चंगळवादाचे
₹60.00आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.
डॉ. नरेंद्र दाभोलकर