नामदार गोखले चरित्र | Namdar Gokhale Charitra
₹240.001866 ते 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृती वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी 1925 मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.
Sadhana Yuva Diwali 2023 | साधना युवा दिवाळी 2023
₹80.00अनुक्रम
१. आणि मी ‘श्यामची आई’ पडद्यावर साकारली… – गौरी देशपांडे
२. पुणे ते ऑस्ट्रेलिया व्हाया टीव्ही मीडिया – हर्षदा स्वकुळ
३. हमदर्द विद्यापीठाकडून, उम्मीद अकेडमी कडे – वली रहमानी
४. ‘ऑड मॅन’ चा प्रवास नाशिक ते न्यूयॉर्क- धैर्य दंड
५. सिलीकॉन व्हॅली. टितोडी आणि किस्सान जीपीटी- प्रतीक देसाई
जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4
₹1,200.001 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 1994 मध्ये ‘Janata Party Experiment’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 1200 पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड 1 व 2 चे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड 3 व 4 चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत 350 रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. 1975 ते 1980 या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!
Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8
₹1,920.0015 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून 205 लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील 120 व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. 2007 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय-सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.
७८ मुलाखतींची पुस्तके | 78 Mulakhatinchi Pustake
₹900.00आम्हा घरी धन
– संपादन : विनोद शिरसाठ
(महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य पुरस्कारप्राप्त २२ व्यक्ती व त्या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची एक अशा एकूण २३ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह)
देव तेथेचि जाणावा
– संपादन : विनोद शिरसाठ
(महाराष्ट्र फाउंडेशनचे समाजकार्य पुरस्कारप्राप्त २५ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या २५ मुलाखतींचा संग्रह)
धर्मरेषा ओलांडताना
– संवादक : हिनाकौसर खान
(आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या १५ मुलाखतींचा संग्रह)
केशवरावांच्या मुलाखती
– विनोद शिरसाठ
(दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केशवरावांच्या डेक्कन कॉलेज परिसरात भल्या पहाटे घेतलेल्या ११ मुलाखतीचा संग्रह)
तीन संपादकांच्या मुलाखती
– संवादक : संकल्प गुर्जर व जायली वाव्हळ
– अनुवाद : प्रभाकर पानवलकर व सुहास पाटील
(इंग्रजी पत्रकारितेतील एन. राम, शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या तीन पिढ्यांतील तीन मोठ्या संपादकांच्या मुलाखतींचा संग्रह)
भारत सासणे यांची मुलाखत
– संवादक : दासू वैद्य
(उदगीर येथे झालेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची त्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली दीर्घ मुलाखत)
Keshavaravanchya Mulakhati | केशवरावांच्या मुलाखती
₹120.006 जानेवारी 2020 रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे 200 वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा 150 वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.
केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?