पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan
₹280.00शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे । Prashna Tumcha Uttar Dabholkaranche
₹70.00हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.
बखर : भारतीय प्रशासनाची | Bakhar : Bharatiya Prashasanachi
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टीकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
बापू : एकभाषित चिंतनकाव्य | Bapu : Ekbhashit Chintankavya
₹100.00बापू : एकभाषित चिंतनकाव्य (स्मृतिरचना) – महात्मा गांधी यांच्या जीवनातील 77 प्रसंगांना शब्दरूप देताना रा. ग. जाधव सरांनी 70 वर्षे मनाच्या कोपऱ्यात दडलेले संचित बाहेर काढले आहे.
बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani
₹100.00काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट