Shop

Saleनवी पुस्तके

Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत

60.00

कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.

 

Saleनवी पुस्तके

Keshavaravanchya Mulakhati | केशवरावांच्या मुलाखती

75.00

६ जानेवारी २०२० रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे २०० वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा १५० वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी ! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.

केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?

 

     

Saleनवी पुस्तके

Dev Tethechi Janava | देव तेथेचि जाणावा

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने १९९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण २५ व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

   

Chikhalache Pay | चिखलाचे पाय

100.00

डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात… “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.

– प्रा. डॉ. तारा भवाळकर

     

Sangat Narharchi | संगत नरहरची

200.00

संगत नरहरची (चरित्रात्मक) – महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्याशी वय वर्षे १० ते २१ या काळात, त्यांच्या सहवासात राहिलेल्या मधु कुरुंदकर या जिवलग मित्राने लिहिलेल्या आठवणी.

     

Kaifiyat | कैफियत

140.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.

     

Majhe Vidhyarthi | माझे विद्यार्थी

140.00
माझे विद्यार्थी (व्यक्तिचित्रे) – एका प्राथमिक शिक्षकाला त्याच्या कारकिर्दीत भेटलेली काही अफलातून यशस्वी व अयशस्वी मुले- मुली.

         

Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment | कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांसी रेजिमेंट

280.00
राणी झांसी रेजिमेंटची उभारणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कशी केली, त्याची रोमहर्षक कहाणी.

     

1 19 20 21 26