Dev Tethechi Janava | देव तेथेचि जाणावा
₹240.00महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 25 व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.