दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)
₹100.00या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे.
Manvantar | मन्वंतर
₹140.00मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
अशी घडले मी | Ashi Ghadale Mi
₹120.00अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.
रुग्णानुबंध | Rugnanubandha
₹160.00रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.
पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan
₹280.00शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
हिरवे पान | Hirave Paan
₹70.00हिरवे पान (पत्रसंग्रह) – फर्ग्युसन कॉलेजमध्ये वयाच्या विशीत असताना संकल्प गुर्जर या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लिहिलेली पत्रे.
अशानं आसं व्हतं | Ashana Asa Vhata
₹140.00अशानं आसं व्हतं (आत्मकथनात्मक) – एका दहा – बारा वर्षांचा खेड्यातील मुलगा त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी सांगतो ते अनुभव खानदेशातील तावडी बोलीत पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.