राजकारणाचा ताळेबंद | Rajkarnacha Taleband
₹200.001947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा जेष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.
1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा जेष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.
जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा… लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
आधुनिक मराठी कवितेचे एक शतक सरले; दुसरे उदयाला येण्याचा हा क्षण आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष यांची आंदोलने समतोल मनाने झेलून परंपरेचे भान मात्र जागृत ठेवायला हवे. या छोट्याशा पुस्तकाचा हेतू एवढाच आहे. आपला परामर्श सर्वसमावेशक नसला तरी प्रातिनिधिक मात्र असला पाहिजे, या दृष्टीने टाकलेली ही केवळ पहिली पावले आहेत. एका शतकाच्या वाटचालीचा हा बोलका आलेख आहे, गेल्या शतकाने उचललेल्या पावलांचे ठसे आज सुवर्णमुद्रांसारखे वाटतात. त्यांच्यावर नजर टाकून उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यायला हवा.
जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…
२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा २२ वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. श्याम या पुस्तकात पाचवी साठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.
श्याम पाचवी साठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.
‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट २०२३ च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
पुस्तकात ४२ प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील ३५ छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्वाचा ऐवज आहे.