Shop

गांधींविषयी (खंड 2)-गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व | Gandhinvishyi (Khand 2)-Gandhivichar ani Samkalin Vicharvishwa

400.00

गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे.

समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल, असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ या दुसऱ्या खंडामध्ये सॉक्रेटिस-टागोरांपासून ते आंबेडकर-लोहियांपर्यंत एका विशिष्ट विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधी विचारांची चर्चा केली असल्याने गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भचौकट प्राप्त झाली आहे.

यातूनच आपल्याला आजच्या समस्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी दिशा प्राप्त होणार आहे.

गांधींविषयी (खंड 1)-जीवन व कार्य | Gandhinvishyi (Khand 1)-Jeevan va Karya

480.00

गेल्या शंभर वर्षातील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले.हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधीः व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही, तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.

 

 

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

वेध अंतर्वेध | Vedh Antarvedh

240.00
प्रतिभावान लेखकांची नानाविध रंगांची उधळण करणारी आणि सुगंध दरवळणारी तजेलदार साहित्यसुमने माझ्या परडीत नाहीत. या लेखसंग्रहात आहेत त्या फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक, संसदीय, तत्त्वज्ञानविषयक, भारतीय घटनासंबंधित आणि वैज्ञानिक समस्यांची मीमांसा करणाऱ्या लेखांच्या शुष्क समिधा! या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, विज्ञानशास्त्र, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतील परिवर्तनाच्या आणि उपक्रमशीलतेच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतलेला आढळेल, तर दुसऱ्या भागात विविध वैचारिक समस्यांबाबतच्या माझ्या अंतर्वेधाचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. गेली अनेक वर्षे मी केलेले लिखाण म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रांत निर्माण झालेल्या नव्या नव्या वैचारिक आव्हानांना दिलेला प्रतिसाद आहे. या वास्तवाचा प्रत्यय वाचकांना प्रस्तुत लेखसंग्रहात येईल.

 

   

Saleनवी पुस्तके

विकास गीते | Vikas Geete

80.00

आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.

     

Viplavi Bangla Sonar Bangla | विप्लवी बांगला सोनार बांगला

160.00

मे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानाच्या निमित्ताने बांगलादेशला गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जानेवारी ते एप्रिल 2021 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्या दोन्ही लेखमालांचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचा पूर्वार्ध विप्लवी बांगला म्हणजे संघर्षशील बांगलादेश आणि उत्तरार्ध सोनार बांगला म्हणजे विकसनशील बांगलादेश. इ.स. 2020-21 हा काळ म्हणजे शेख मुजिबुर रहेमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, म्हणून या पुस्तकाला विशेष औचित्य आहे.

हे लिखाण म्हटले तर आठवणींचे आहे, म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, आणि यात काही मुलाखतीही आहेत. पण माझ्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे बांगलादेशाच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतराचा आलेख आहे.

– माधव गोडबोले (निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव)

     

 

Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

240.00
हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लीम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लीम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज-प्रबोधनास कसे तयार होणार?
भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

     

बहादूर थापा आणि इतर कविता | Bahadur Thapa Aani Itar Kavita

140.00
बहादूर थापा (कवितासंग्रह) – आपल्या सभोवताली असतात, पण त्यांचे अस्तित्व आपण गृहीतच धरत नाही अशा 25 व्यक्तींवरील कविता.

           

1 25 26 27 28