सा. रे. पाटील बोलतोय | Sa. Re. Patil Boltoy
₹120.00सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.
(शब्दांकन – किशोर रक्ताटे)
सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.
(शब्दांकन – किशोर रक्ताटे)
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हेच आहे.
सुंदर पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची आई (आत्मकथनात्मक)
श्याम (आत्मकथनात्मक)
धडपडणारा श्याम (आत्मकथनात्मक)
श्यामचा जीवनविकास (आत्मकथनात्मक)
सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.
सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.
– ना. ग. गोरे
1971 ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला, त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!
भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक महत्त्वाचे मानले जाते. का, तर ते सत्तांतराचे शतक आहे, नव्या जीवनजाणिवांच्या आरंभाचे शतक आहे, वैचारिक कलहाचे शतक आहे, आत्मपरीक्षणाचे शतक आहे, परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार न करता परंपरेला आव्हान देणारे शतक आहे, मूलभूत प्रश्नांची जाग आणणारे शतक आहे, परंपरेला आक्रमकपणे सामोरे जाऊन नवा विचार मांडणाऱ्यांचे शतक आहे, नव्या शक्तीच्या उपासनेचे शतक आहे, एवंच, प्रबोधनाचे शतक आहे. ‘तत्पूर्वीच्या एक हजार वर्षांत जे घडले नाही’ ते ज्या शतकात घडले असे शतक आहे, मराठी वाङ्गयाच्या दृष्टीने नवनवीन लेखने व लेखनप्रकार ज्या शतकात निर्माण झाले असे शतक आहे. या शतकाने मराठी वाङ्गयाला जी अनमोल रत्ने दिली, त्यांपैकी एक म्हणजे ताराबाई शिंदे (1850-1910) यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक. या पुस्तकात स्त्री-पुरुषांमधील सारा असमतोल दूर करून स्त्रीजातीला पुरता न्याय मिळवून द्यावा अशी खटपट आहे. इतके आधुनिक क्रांतदर्शी विचार इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने एका स्त्रीने मांडलेले, मराठी गद्याने पहिल्यांदाच अनुभवले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892) आणि महात्मा जोतीराव फुले (1827-1890) यांच्या लेखणीने ही करामत यापूर्वी केली असली, तरी एका स्त्रीने हे धैर्य दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.