Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण
₹40.00अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.
श्यामची आई | Shyamchi Aai
₹240.00साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट २०२३ च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
पुस्तकात ४२ प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील ३५ छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्वाचा ऐवज आहे.
Vadalache Kinare | वादळाचे किनारे
₹80.00नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येकवेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची बुद्धीची, क्षमतांची.
Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका
₹60.00१४ डिसेंबर १९४७ ते ४ जानेवारी २०२३ असे ७५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. १९९४ नंतरच्या २८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.
Balkavitancha Super Chaukar | बालकवितांचा सुपर चौकार : चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलमगोल, क कवितेचा
₹300.00मराठीतील नामवंत कवी दासू वैद्य यांनी मागील दोन दशकांत लिहिलेल्या कवितांची ही चार पुस्तके आहेत.
1. चष्मेवाली : पाने 24 (यात एकच गोष्टीरुप दीर्घ कविता आहे.)
2. गोलमगोल : पाने 32 (यात 15 लहान कविता आहेत.)
3. झुळझुळ झरा : पाने 36 (यात 16 लहान कविता आहेत.)
4. क कवितेचा (यात 31 लहान कविता आहेत.) डबल क्राऊन आकारात, आर्ट पेपरवर, भरपूर चित्रे असलेली, संपूर्ण बहुरंगी पुस्तके!
Ladhe Andhashraddheche | लढे अंधश्रद्धेचे
₹280.00लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.