Author

ग. प्र. प्रधान | G. P. Pradhan

स्वातंत्र्य सैनिक, इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे नेते, विधान परिषदेचे सदस्य आणि साधना साप्ताहिकाचे संपादक अशी विविधांगी ओळख असलेल्या ग. प्र. प्रधान यांना 1922 ते 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभले. प्रधानसरांनी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे.

Author's books

Saleनवी पुस्तके

Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdat | डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत

70.00

हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.

मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.

बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.

 

     

Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक

500.00

टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.

     

Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8

2,000.00

१५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून २०५ लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील १२० व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.

       

 

Saleनवी पुस्तके

Tolstoy Yanchashi Patrasanwad | टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद

120.00
आपणास जगातून अनेकजण पत्रं लिहीत असत आणि आपण सर्व पत्रांची दखल घेऊन, बऱ्याच पत्रांना उत्तरे लिहीत होतात. हे माहीत असल्यामुळेच मी आपणास काही पत्रं लिहिणार आहे. आपल्या उदात्त जीवनाशी माझा जो भावबंध आहे, त्यामुळेच मला हे करावेसे वाटते. या पत्रांमुळे हा भावबंध अधिक दृढ होईल आणि माझ्या जीवनाच्या या संध्यासमयी तो मला मोठा आधार वाटेल.

         

 

नारायणीय – निवडक ना. ग. गोरे | Narayaniya – Nivadak N. G. Gore

280.00

कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. – ना. ग. गोरे

     

माझी वाटचाल | Mazi Vatchal

240.00

जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रीतीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.

     

सोनार बांगला | Sonar Bangala

100.00

1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रमाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!

             

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat

280.00

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.

     

1 2