संकीर्ण

Aikta Daat । ऐकता दाट

160.00

अट एकच… ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.

     

Saleनवी पुस्तके

Asidhara | असिधारा

160.00

केशव ऊर्फ बंडू गोरे,समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग, कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद.

आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा ‘बायोडेटा’. पण बायोडेटामध्ये मावणारं हे व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची त्यांना योग्य जाण होती.

केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका संपूर्ण काळाचं ते दस्तऐवजीकरण होतं. हा दुर्मीळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे….

.

 

Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta | बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता

280.00

रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.

       

 

Charvak। चार्वाक

160.00

आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.

     

Gandhinche Garud | गांधींचे गारुड

140.00
सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मागरिट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मागरिट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने आलेल्या, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या. काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली.

     

Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला

280.00

हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.

     

Saleनवी पुस्तके

Out Of The Box | आऊट ऑफ द बॉक्स

100.00
कार्यक्षम प्रशासक आणि सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असणारे लक्ष्मीकांत देशमुख 2014 मध्ये आय.ए.एस. सेवेतून निवृत्त झाले आणि 2018 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांची एक दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकातून क्रमश: आठ भागांत प्रकाशित केली होती. ती संपूर्ण मुलाखत आता एकत्रित स्वरूपात पुस्तकरूपाने आणली आहे.

     

Saleनवी पुस्तके

Rugnanchya Chashmyatun | रुग्णांच्या चष्म्यातून

120.00
एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
– अतुल देऊळगावकर (प्रस्तावनेतून)

     

1 2 6