थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, आंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा 20 नामवंतांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.
हिंदभक्त विदेशिनी (व्यक्तिचित्रे) – विदेशातून आलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या मेरी कार्पेन्टर, ॲनी बेझंट, मीरा बहन इत्यादी 11 महिलांची ओळख करून देणारा लेख.
तात्पर्य (कुमारकथा) – युवा साहित्य अकादमी विजेत्या लेखकाने त्याच्या वयाच्या विशीत लिहिलेल्या व साधनात आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नऊ बालकुमार कथा.