मुका म्हणे… | Muka Mhane…
₹160.00मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.
अशी घडले मी | Ashi Ghadale Mi
₹120.00अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.
Shyamchi Aai Watchal eka Sahityakrutichi | श्यामची आई वाटचाल एका साहित्यकृतीची
₹100.00‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल 88 वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
₹240.00‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.