मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe
₹200.00मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.
डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.
डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटिश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहिलेले दोन दीर्घ लेख.
सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.
गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.