Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका
₹60.0014 डिसेंबर 1947 ते 4 जानेवारी 2023 असे 75 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. 1994 नंतरच्या 28 वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.