राजकीय

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat

280.00

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.

     

Saleनवी पुस्तके

टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics

160.00

एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.

     

जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4

1,200.00

1 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 1994 मध्ये ‘Janata Party Experiment’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 1200 पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड 1 व 2 चे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड 3 व 4 चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत 350 रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. 1975 ते 1980 या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!

 

       

 

Saleनवी पुस्तके

Keshavaravanchya Mulakhati | केशवरावांच्या मुलाखती

120.00

6 जानेवारी 2020 रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे 200 वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा 150 वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.

केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?

 

     

चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे | Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne

70.00

चले जाव (भाषणसंग्रह) – 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.

     

भारतातील मुस्लिम राजकारण | Bhartatil Muslim Rajkaran

160.00

भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.

     

 

इस्लामचे भारतीय चित्र | Islamche Bhartiya Chitra

70.00

इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.