कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा | Kanosa- Bhartatil Muslim Manacha
₹80.00कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान – थोरांशी साधलेली संवादचित्रे.
‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.
जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा… लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.
तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.
झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्वजण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.
वाचावे कसे हे शिकवण्यासाठी “नवी क्षितिजे” हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले “झुंडीचे मानसशास्त्र” हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळया भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे “द क्राउड”, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे “द ट्रू बिलिव्हर”, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे “झुंडी” आणि “सच्चा अनुयायी” या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि झुंडीचे मानसशास्त्र हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पुरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.