Sadhana

Sadhana Yuva Diwali 2022 | साधना युवा दिवाळी 2022

60.00

या अंकात विविध क्षेत्रातील पाच कर्तबगार तरुण तरुणींच्या मुलाखती आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून या मुलाखती घोसात आल्या आहेत. या मुलाखती युवकांच्याच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या वाचकांच्या विचारांचे क्षितिज रुंदावतील आणि मुख्य म्हणजे समाजसन्मुख जगण्यासाठी अधिक आशादायी भावना मनात जागृत करतील.

     

Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022

130.00

साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक

     

Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023

140.00

अनुक्रम

विभाग १

१ ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन करताना । सुजय डहाके

२ ‘श्यामची आईची पटकथा लिहिताना । सुनील सुकथनकर

३ ‘श्यामची आई’ मध्ये छोटा श्याम साकारताना । शर्व गाडगीळ

 

विभाग २

दोन शास्त्रीय गायकांवर तीन मुलाखती

१ कुमार स्वर एक गंधर्व कथा’ साठी लेखन करताना

– माधुरी पुरंदरे –

२ कुमार स्वर एक गंधर्व कथा साठी चित्रे काढताना

चंद्रमोहन कुलकर्णी

१३ शास्त्रीय गायन हेच क्षेत्रं ठरलं, त्यापूर्वीची मी…

नीला भागवत

 

विभाग ३

दोन मुलाखती। एक शेतकऱ्याची, एक तळेकऱ्याची

१ तलाव संवर्धनाची चळवळ जगभर न्यायची आहे!

• आनंद मल्लीगवाड

२ ‘सह्याद्री फार्म्स’: शेती क्षेत्रातील कोंडी फोडण्याचा एक मार्ग

– विलास शिंदे

 

विभाग ४

संकीर्ण प्रकारातील चार लेख

अवकाशाची दृश्यात्मकता । अमोल पालेकर

घाशीराम व अंताजीची, भेट! | अतुल देऊळगावकर

बालपणीचं पुणं । राजन अन्वर

एक्स्प्रेस पुराण: पहिला अध्याय । विनय हर्डीकर

 

   

Saleनवी पुस्तके

दृष्टी आरोग्यक्रांतीची | Drushti Aarogyakrantichi

240.00

ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.

वीणा गवाणकर

 

Saleनवी पुस्तके

मानवजातीची कथा | Manavjatichi Katha

320.00

या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात : 

संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.

‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा’ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.

     

Saleनवी पुस्तके

राजकारण जिज्ञासा | Rajkaran Jidnyasa

200.00

राजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.
https://www.amazon.in/dp/B0G949J2NT

Saleनवी पुस्तके

संकीर्ण निबंध | Sankirna Nibandha

480.00

“सर्वंकष दृष्टीने पाहिले तर इथे मांडलेले चित्र अजिबात समाधानकारक नाही, हे खरे आहे. मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे, त्यात पूर्णत्वास गेलेले गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकता दिसते आहे, या दृष्टीने त्याचे कौतुक व्हायला हवे. चाळीस वर्षांच्या तुटपुंज्या कालावधीचा विचार केल्यावर मात्र आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचे प्रमाण पाहून आश्चर्य वाटते. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचे तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम लक्षणीय ठरते.

मराठीने आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचे अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही, अशी मला आशा आहे. परंतु, परक्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु, वर्तमानकाळ अनेक अर्थानी आश्वासक आहे, आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, अशी स्पष्ट शक्यताही दिसते आहे.”

न्या. महादेव गोविंद रानडे (देशी प्रकाशनसूचीमधील मराठी भागाबद्दल टिप्पणी)

   

Saleनवी पुस्तके

साप्ताहिक साधना विशेषांक ‘गोवा : ज्ञात आणि अज्ञात’| Weekly Sadhana Special Issue ‘Goa : Known And Unknown’

120.00

गोव्याबद्दल संपूर्ण भारतात, आणि शेजारच्या महाराष्ट्रातसुद्धा, गैरसमजच जास्त आहेत. शिवाय समुद्रकिनारे, नाईट लायफ, मौजमजा, अर्धनग्र फॉरेनर्स, दारूबाजी, ड्रग्स, सॅक्स टुरिजम अशीच गोव्याची ओळख जास्त आहे. गोव्याचा मायकल ‘दारू पीके दंगा करता है’ हीच आमची प्रतिमा अगदी सर्वांनीच रंगवलेली आहे. तेव्हा गोव्याचे खरेखुरे अंतरंग दाखवायचे हे पक्कं ठरलं. तोच थोडाफार प्रयत्न या विशेषांकातनं केलाय… गोव्यावर पोर्तुगिजांनी 451 वर्षे राज्य केलं हाच इतिहास सर्वज्ञात आहे. ते पहिले नव्हे तर शेवटचे राज्यकर्ते होते, त्यापूर्वी उत्तर आणि दक्षिण भारतातील 15 राजवटी गोव्यात होत्या आणि केवळ एक पंचमांश गोवा साडेचार शतकं पोर्तुगीज सत्तेखाली होता हा अज्ञात इतिहास आहे… या अंकात आम्हाला अभिमान असलेल्या धार्मिक सलोख्यावर ज्ञानपीठकार दामोदर उर्फ भाई मावजो यांचा फार सुंदर लेख आहे. हा सलोखा जेवढा हिंदू-खिश्चनांमध्ये आहे, तेवढाच हिंदू-मुस्लिमांमध्येही आहे… इथला पोर्तुगीजकालीन समान नागरी कायदा सर्वांसाठी आहे. तो वाचल्यास भारताला कशा प्रकारचा समान नागरी कायदा हवा ते वाचकांना उमजेल. इथली देवदासी निर्मूलन चळवळ ही भारतातील बहुधा एकमेव अशी शांततापूर्ण यशस्वी क्रांती असेल. या चळवळीने संपूर्ण देशाला काय दिलं तेही तुम्हाला समजेल. सतीच्या प्रथेवर गोव्यात पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकातच बंदी घातली होती… गोव्याचा आदिवासी हा केवळ जंगल भागातच रहात नाही, तर समुद्रकिनारी भागात आणि गोव्याच्या ‘मिडलैंड’मध्येही रहातो. तिथे त्यांनी समुद्राचे खारे पाणी अडवून व गोडवा पाण्याला बाट करून देऊन किनारप‌ट्टी भागात खाजनातून शेती, भाजी व मासळीचे उत्पादन करण्याचा बहुढंगी चमत्कार कसा केला तेही इथं वाचायला मिळेल. शेतीप्रधान असलेला गोवा केवळ लोकचळवळीतून आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र कसा बनला तेही या अंकातून उमजेल.