भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्या वेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान-थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.
तो अंक प्रकाशित झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 2022 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. याच वेळी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, साधना साप्ताहिक 75 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. याच दरम्यान ‘दलित पँथर’च्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, आणि अनिल अवचट यांचा मृत्यूनंतरचा पहिला जन्मदिवस येत आहे. वरील सर्व औचित्यं लक्षात घेऊन तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.
Reviews
There are no reviews yet.