“आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, भाऊर कन्नड, बंगाली साहित्यात मोठा फरक जाणवतो. साठ सालापर्यंतच्या मराठी साहित्यात फक्त मध्यमवर्गीय जीवन व त्यातल्या समस्या येतात; भोवती एवढं प्रचंड जग पसरलं आहे, याची या साहित्याला कल्पनाच नसावी. ग्रामीण व दलित लेखकांनी साठनंतर हे वास्तव मराठी साहित्यात आणले. संतोषची कविता असेच डोळे उघडण्याचे काम करणारी आहे. प्रेमचंदांच्या साहित्यात जमीनदारही अस्सल असतो, आणि चांभारही. तसं आपल्या साहित्यात आता आता व्हायला लागलंय. संतोषची कविता त्याचाच एक भाग आहे.”
– अनिल अवचट, प्रस्तावनेतून.
Reviews
There are no reviews yet.