रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण. हे लिखाण फक्त स्मरणरंजनासाठी नसून त्यात एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सामाजिक आणि वैयक्तिक प्रवास चित्रित झाला आहे. रमेशचे मित्र, सोबतचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांनी सांगितलेल्या या आठवणींमधून रमेशचा हरहुन्नरी स्वभाव, जगण्याचा अनेक अंगांनी आस्वाद घेण्याची त्यांची असोशी आणि त्याचबरोबर समाजातल्या साध्या माणसांच्या सुख-दुःखाशी जोडून घेऊन काम करण्याची त्यांची तळमळ यांचं या पुस्तकात मनोज्ञ दर्शन घडतं. एक सामाजिक कार्यकर्ता आपल्याला मिळालेल्या छोट्याशा आयुष्यात जगण्याला किती अंगांनी भिडू शकतो याचंही एक रसरशीत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.
Aikta Daat । ऐकता दाट
₹160.00अट एकच… ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.