रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण. हे लिखाण फक्त स्मरणरंजनासाठी नसून त्यात एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सामाजिक आणि वैयक्तिक प्रवास चित्रित झाला आहे. रमेशचे मित्र, सोबतचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांनी सांगितलेल्या या आठवणींमधून रमेशचा हरहुन्नरी स्वभाव, जगण्याचा अनेक अंगांनी आस्वाद घेण्याची त्यांची असोशी आणि त्याचबरोबर समाजातल्या साध्या माणसांच्या सुख-दुःखाशी जोडून घेऊन काम करण्याची त्यांची तळमळ यांचं या पुस्तकात मनोज्ञ दर्शन घडतं. एक सामाजिक कार्यकर्ता आपल्याला मिळालेल्या छोट्याशा आयुष्यात जगण्याला किती अंगांनी भिडू शकतो याचंही एक रसरशीत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.
तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas
₹200.00डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.
Reviews
There are no reviews yet.