अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे. इथे भाषांतराचा आशय टिळक-चरित्र हा असल्यामुळे वरील गुंतागुंतीची उकल करताना टिळकांच्या जीवनातील काही घटना-घडामोडींचा संदर्भही त्यात सविस्तर आलाच आहे. शेवटी, त्यांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींचं वर्णन किंवा विवरण करण्यासाठीच मूळ लेखकांनी शब्द वापरले आहेत. त्यामुळे मराठी भाषांतरकाराने टिळक-चरित्राच्या निमित्ताने इतरही संदर्भ सोबतीला घेत, त्याच्यासमोर आलेले पेच किंवा त्याला जाणवलेल्या काही शक्यता नोंदवायचा प्रयत्न या टिपणातून केला आहे.
संकीर्ण निबंध | Sankirna Nibandha
₹480.00“सर्वंकष दृष्टीने पाहिले तर इथे मांडलेले चित्र अजिबात समाधानकारक नाही, हे खरे आहे. मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे, त्यात पूर्णत्वास गेलेले गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकता दिसते आहे, या दृष्टीने त्याचे कौतुक व्हायला हवे. चाळीस वर्षांच्या तुटपुंज्या कालावधीचा विचार केल्यावर मात्र आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचे प्रमाण पाहून आश्चर्य वाटते. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचे तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम लक्षणीय ठरते.
मराठीने आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचे अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही, अशी मला आशा आहे. परंतु, परक्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु, वर्तमानकाळ अनेक अर्थानी आश्वासक आहे, आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, अशी स्पष्ट शक्यताही दिसते आहे.”
न्या. महादेव गोविंद रानडे (देशी प्रकाशनसूचीमधील मराठी भागाबद्दल टिप्पणी)
Reviews
There are no reviews yet.