अंधारच अंधार
अंधार हटत नाही,
‘तिमिरातुनी तेजाकडे’ वाट नाही,
सगळी प्रकाशयंत्रे व यंत्रणा जारी,
पण तम ढळतचि नाही;
कोण होते ते महाभाग ?
चार महिन्यांपूर्वीचे,
कुठून आले? कुठे गेले?
काय करून गेले… ?
हळहळीच्या मशाली पेटवून
मनामनांत !
ते आले, वाट बघत राहिले
डॉक्टर दिसताच त्यांचा
पाच-पंचवीस पावलांचा गनिमी पाठलाग
अन् त्यांना गाठून ओरडण्याचीही संधी न देता
ठो ठो ठो…!
पाच गोळ्या डॉक्टरांचे पंचप्राण हिरावून नेणाऱ्या !
Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8
₹2,000.00१५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून २०५ लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील १२० व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.
Reviews
There are no reviews yet.