देश- विदेशांतला प्रवास हा आंतरिक आनंद देणारा अनुभव असतो. कालांतराने दुधाचे दही व्हावे त्याप्रमाणे हे अनुभव आंबून त्यांची अनुभूती होते. छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचे किंवा निसर्गाचे जशाचे तसे प्रतिबिंब पडल्याचे दिसते. चित्राची गोष्ट वेगळी आहे. चित्रकार एखादी व्यक्ती किंवा निसर्ग पाहताना आपल्या मनात भावनांचे जे कल्लोळ उसळले त्याचे मिश्रण आपल्या चित्रात करत असतो. या पुस्तकात अंतर्भूत झालेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीत लिहिली आहेत. मात्र ही निव्वळ प्रवासवर्णनं नाहीत. लेखक त्या त्या देशांच्या नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक रसायनात आकंठ बुडाला आहे. त्यामुळे लेखकाने प्रभाववादी शैलीने लेखन केलं आहे ज्याप्रमाणे चित्रकार प्रभाववादी (इम्प्रेशनिस्ट) शैलीतून चित्रे काढतो, म्हणूनच या प्रवासवर्णनात वाचकाला लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांचे अस्तित्त्व जाणवते. मात्र त्याच्या मनात त्या त्या देशांत प्रवास करण्याची इच्छा देखील निर्माण करते.
Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022
₹130.00साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक
Reviews
There are no reviews yet.