कैफियत : माझी. माझ्या भोवतालची. प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची, माणसांची. साऱ्यांचीच. आमचं साऱ्यांचंच अस्तित्व धोक्यात आलंय. पटणार नाही तुम्हांला. पण खरंच. आम्ही जिवंत राहू, तग धरू अशी शक्यताच अंधुक झालीय. कोणीतरी निर्दयपणे ओरडबाडतंय साऱ्यांना. ओरबाडण्यात आम्ही सामील असणारच. कारण ओरबाडणं, हिसकावणं, लुटणं, लंपास करणं म्हणजे काय? हे कळावं, अशी संवेदनाच संपून गेलीय आमच्यातून. आम्ही जिवंत आहोत, म्हणजे काय? आम्ही काय करतोय? काय बोलतोय? कळतच नाही आम्हांला. भांबावून टाकणारं, भयग्रस्त करणारं, भोवळ आणणारं वर्तमान.
जिंकुनि मरणाला | Jinkuni Maranala
₹120.00कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही. वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला. त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत. हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.
– ना. ग. गोरे
Reviews
There are no reviews yet.