या विस्तृत जीवनाचा विचार करत असताना लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे इथं काही आपण तेवढेच नाही. आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीची माणसंही इथं आहेत, प्राणीमात्रही आहेत.. त्यांचा नफा-तोटा आणि आपला नफा-तोटा एकमेकांत गुंतले आहेत हे आपण जाणलं पाहिजे. आपल्या कितीतरी इच्छा पूर्ण होत नाहीत. इतरांच्या लाभामध्ये त्याचा अडसर झाल्यामुळे असं घडत आहे. इतरांचे लाभ आपल्यासारख्या एकट्या-दुकट्यांच्या अपेक्षा मोडून काढण्याइतके बलिष्ठ असतात. त्यामुळे आपले प्रयत्न व्यर्थ गेले म्हणून गळा काढायची गरज नाही. जगात जगत असताना शेकडो वेळा हार पत्करल्यानंतर एक-दोन दशाचे प्रसंग कदाचित येतील. जीवन-संग्रामात जगण्याबरोबरच हरण्यालाही तितकंच महत्त्व आहे.. हरण्यातूनच जीत शक्य होत असते. हे जाणून घेतलं तर आपल्या विस्तृत जीवनातील कल्पना आणि कृती कधीही निरर्थक भासणार नाहीत. त्या आपलं जीवन उजळून टाकतात. मी जगण्यासाठी कष्ट घेतले आहेत, माझ्याकडून शक्य होतं ते सगळं मी केलं आहे, अशी तृप्ती आपल्या जीवनातून आपल्याला मिळाली पाहिजे. या लेखनातून व्यक्त झालेले अभिप्राय हेच माझं जीवनाविषयीचं अंतिम चिंतन असा निष्कर्ष काढू नये. आजवरच्या माझ्या जीवनातील अनुभवांचं हे सार आहे. पुढील जीवन या अभिप्रायांवर संस्कार करू शकेल, एवढंच काय बदलही घडवू शकेल. जोपर्यंत जीवन हाच सत्याचा शाश्वत शोध घेण्याचा मार्ग आहे, तोपर्यंत हे अभिप्राय व्यर्थ नाहीत. ‘सत्य’ ही विशिष्ट काळाच्या तुलनेनुसार बदलणाऱ्या जीवनाविषयीची जाणीव आहे….
₹200.00 ₹160.00
कारंत चिंतन | Karant Chintan
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 110 |
Related products
श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas
‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani
काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट
आठवणी जुन्या शब्द नवे | Athvani Junya Shabda Nave
आठवणी जुन्या आणि शब्द नवे. वर्षानुवर्षे कुठेतरी साठवून ठेवलेले आणि साठून राहिलेले हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. भूतकाळात डोकावून पाहताना प्रसंग, चित्रे जशीच्या तशी उभी राहात गेली. आणि नकळत कागदावर उतरत गेली. हे चित्रण म्हणजे केवळ घटनांचे किंवा व्यक्तिरेखांचे वर्णन नसून, त्याच्यामागे असलेल्या मनातील भावनांचा प्रवाह आहे.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
Reviews
There are no reviews yet.