उदारमतवादाचा पुरस्कार करणारा, पण स्वतःची अशी एक भूमिका असणारा आकाश, ज्यांच्या सामाजिक जाणिवा बऱ्यापैकी विकसित झाल्या आहेत. अशा पाच तरुण मित्रांशी चर्चा करतोय, अशी या सदराची मध्यवर्ती कल्पना होती. विज्ञान, राजकारण, मतदान, लोकशाही, वाचन, शिक्षण, अंधश्रद्धा, अध्यात्म, गांधी अशा विविध विषयांवर आजचे परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करीत असलेले तरुण कसा विचार करतात, याची झलक दाखवण्याचा प्रयत्न या लेखांमधून केला आहे.
भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank
₹50.00क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.
Reviews
There are no reviews yet.